पुढच्या आठवड्यात मोदी रशियाला जाणार

पीटीआय
मंगळवार, 15 मे 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पुढील आठवड्यात अनापैचारिक चर्चा होणार असून, त्यासाठी मोदी 21 मे रोजी मॉस्कोला रवाना होणार आहेत. ही बैठक रशियाच्या सोची येथे शहरात होणार आहे. रशियाचे चौथ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट असणार आहे. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात पुढील आठवड्यात अनापैचारिक चर्चा होणार असून, त्यासाठी मोदी 21 मे रोजी मॉस्कोला रवाना होणार आहेत. ही बैठक रशियाच्या सोची येथे शहरात होणार आहे. रशियाचे चौथ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच भेट असणार आहे. 

उभय नेत्यांत द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. ही भेट दोन्ही देशांतील नेत्यांना विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठीची महत्त्वाची संधी असल्याचे सांगितले जात आहे. या भेटीतून व्यूहरचनात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात चीन दौऱ्यात अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक चर्चा केली होती. डोकलामवरून निर्माण झालेला तणाव संपल्यानंतर ही भेट महत्त्वाची होती. 

Web Title: PM Modi to visit Russia next week