एक लाख फ्रंटलाईन वर्कर्ससाठी 'कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स'

एक लाख फ्रंटलाईन वर्कर्ससाठी 'कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना योद्ध्यांसाठी नवा उपक्रमाचं उद्धाटन करणार आहेत. 18 जून म्हणजेच शुक्रवारी पंतप्रधान मोदी कोरोना फ्रंटलाईन वर्कर्ससाठी कस्टमाइज्ड क्रॅश कोर्सची सुरुवात करणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम व्हर्च्यूअल पद्धतीने सकाळी 11 वाजता होणार आहे.

एक लाख फ्रंटलाईन वर्कर्ससाठी 'कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स'
लोजपातील वाद शिगेला; चिराग पासवानांचं लोकसभा स्पीकरला पत्र

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 26 राज्यांमध्ये 111 केंद्र उघडले जाणार आहेत. देशभरातील एक लाख कोरोना योद्ध्यांची कौशल्य अधिक विकसित केले जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी देशाला संबोधित देखील करणार आहेत. या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

एक लाख फ्रंटलाईन वर्कर्ससाठी 'कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स'
लशीसाठी वापरतात वासराच्या रक्तातील अंश; केंद्राने दिलं उत्तर

या कार्यक्रमाअंतर्गत कोरोना योद्ध्यांना सहा कस्टमाइज्ड जॉबसाठी तयार केलं जाईल. यामध्ये होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, एडवांस्ड केअर सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट, सॅम्पल कलेक्शन सपोर्ट आणि मेडीकल इक्विपमेंट सपोर्ट यांचा समावेश असणार आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाअंतर्गत लोकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com