मोदींकडून दीनदयाळ उपाध्याय जयंतीच्या शुभेच्छा

Deendayal Upadhyaya
Deendayal Upadhyaya

नवी दिल्ली- जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांची आज (ता.25) जयंती आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचा आढावा देण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी या व्हिडिओतून दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी संघटन उभे करण्यासाठी कसे प्रयत्न केले हे स्पष्ट केले आहे.


दरम्यान, पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी म्हणजे आजच्या दिवशी झाला होता. तर, मृत्यू 11 फेब्रुवारी 1968 झाला. दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

पं. दीनदयाळ उपाध्याय 1937 साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व 1942 मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचे चिंतनातून व मननातून त्यांनी एकात्ममानववाद हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला. 11 फेब्रुवारी इ.स. 1968 रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com