पंतप्रधान मोदींकडून सोनियांना 'हॅप्पी बर्थडे'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

'वाढदिवसानिमित्त सोनिया गांधी यांना शुभेच्छा. त्यांना दीर्घआयुष्य लाभो ही सदिच्छा,' असे मोदी यांच्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही सोनियांना शुभेच्छा दिल्या, तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी, मोतीलाल व्होरा, पी. चिदंबरम, सुशीलकुमार शिंदे, अशोक गेहलोत, दिग्विजयसिंह, गुलाम नबी आझाद, जनार्दन द्विवेदी यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी सोनियांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: PM Modi wishes Sonia on her birthday