esakal | फोन कॉल आणि मोदींच्या ११ मंत्र्यांचे राजीनामे
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah narendra modi

फोन कॉल आणि मोदींच्या ११ मंत्र्यांचे राजीनामे

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुचर्चित फेरबदल (modi cabinet reshuffle) काल झाले. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांच्या (new minister) शपथविधीआधी ११ खासदारांनी (mps) मंत्रीपदाचे राजीनामे दिले. यामध्ये रवी शंकर प्रसाद, ( ravi shankar prasad ) प्रकाश जावडेकर, हर्ष वर्धन, रमेश पोखरीयाल निशंक हे वरिष्ठ मंत्री आहेत. (pm modis cabinet rejig a phone call that led to 11 resignations)

फक्त एका फोन कॉलनंतर या सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिले, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ११ मंत्र्यांना फोन कॉल करुन राजीनामा देण्याची सूचना केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिला मंत्रिमंडळ फेरबदल आहे. नवीन मंत्र्यांच्या शपथविधीची वेळ जवळ येत असताना, जे.पी.नड्डा यांनी ११ मंत्र्यांना फोन करुन राजीनामा द्यायला सांगितला. सीएनएन न्यूज १८ ने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर राणे तुम्ही काय प्रतिक्रिया दिली ते जरा आठवा - अरविंद सावंत

प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचं काय चुकलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करताना प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद या दोन प्रमुख मंत्र्यांचे घेतलेले राजीनामे सर्वांना आश्चर्यचकीत करणारे होते. कोरोना संकटात चोहोबाजूंनी सरकारच्या नियोजनावर हल्ले होत असताना माहिती व प्रसारण मंत्रालय हे केंद्र सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरल्याचा ठपका जावडेकरांवर ठेवला जात आहे. तर ट्विटरचा वाद रविशंकर प्रसाद यांना भोवला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: गिरगाव चौपाटी जवळचं प्रसिद्ध 'क्रिस्टल' हॉटेल बंद होणार?

मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत काही मंत्र्यांना पूर्व कल्पना देण्यात आली होती आणि राजीनामा देण्यासही पंतप्रधानांनी आधीच सांगितले होते. त्यामध्ये संतोष गंगवार, थावरचंद गेहलोत यासारख्या मंत्र्यांचा समावेश होतो. परंतु, ज्यांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रचंड नाराजी होती त्यांना अक्षरशः अखेरच्या क्षणी सांगण्यात आल्याचे कळते. त्यापार्श्वभूमीवर विस्ताराच्या अवघ्या काही तास आधी या मंत्र्यांचे राजीनामे घेतले. अकार्यक्षमता आणि निष्क्रियतेचा निकष लावून डॉ. हर्षवर्धन यांचा आरोग्यमंत्रिपदावरून, रमेश पोखरीयाल निशंक यांना शिक्षण मंत्रिपदावरून तर सदानंद गौडा यांना रसायन मंत्रिपदावरून नारळ दिला. मात्र जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांच्या गच्छंतीच्या कारणांची चर्चा अधिक आहे.

loading image