Video : मोदी थांबू शकतात तर, आपण का नाही? पाहा गुजरातमध्ये नेमकं काय घडलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कामामुळे आणि भाषणशैलीमुळे नेहमची चर्चेत असतात.
PM Modi
PM ModiSakal
Updated on

Narendra Modi Stop His Carcade For Ambulance : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र, यापूर्वी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हयरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कामामुळे आणि भाषणशैलीमुळे नेहमची चर्चेत असतात. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाहीये. मात्र, आजच्या घटनेनंतर मोदींची प्रतिमा अधिक बळकट होण्यासाठी मदतगार ठरणार आहे.

आज सकाळी मोदी अहमदाबादहून गांधीनगरला निघाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक रूग्णवाहिका थांबलेली दिसली. त्यावर मोदींनी क्षणाचाही विलंब न करता त्वरीत ताफा थांबवत रूग्णवाहिका पहिले जाऊ देण्याच्या सूचना सुरक्षा कर्मचाऱ्यांना केल्या. मोदींच्या या भूमिकेमुळे मोदींनी पुन्हा एकदा भाजपमध्ये व्हिआयपी संस्कृती नसल्याचे दाखवून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ भाजप नेते रुतविज पटेल यांनी शेअर केला आहे. मोदींची ही भूमिका हा एक मोठा मानवतावादी असल्याचेही म्हटले आहे.

PM Modi
Ajit Pawar : पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर

रूग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी मोदींचा ताफा काही काळ थांबल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी मोदींच्या या कामाचे कौतुक केले आहे. अनेकजण रूग्णवाहिकेला रस्ता देत नाही हे आपण पाहिले आहे. मात्र, मोदींनी व्हिआयपी असूनदेखील स्वतः ताफा थांबवण्याच्या सूचना करत रूग्णाचा जीव महत्त्वाचा हे दाखवून दिले आहे. त्यामुळे जर, रूग्णवाहिकेसाठी देशाचे पंतप्रधान स्वतःचा ताफा थांबून वाट बघू शकता तर, आपण का नाही? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

maharashtra Latest Marathi News Live Update
seven killed in Bengaluru rain tragedy
Will DK Shivakumar become Karnataka CM
Who will win West Bengal elections 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com