पंतप्रधानांचे भाषण उर्मटपणाचे : काँग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूकंपावर उपहासात्मक बोलले असले तरी राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या सहारा आणि बिर्ला डायरी प्रकरणावर मात्र त्यांनी पुन्हा मौन पाळले, असे शरसंधान काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केले. राष्ट्रपती अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसला उद्देशून घणाघाती टीका केली होती. त्यावर पंतप्रधानांचे भाषण उर्मटपणाचे असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी पत्रकारांशी बोलताना मोदींचे भाषण उर्मटपणाचे होते, त्यांनी सरकारच्या वाटचालीची दिशा स्पष्ट करण्याची संधी गमावली, अशा शब्दात फटकारले. पुढील वर्षीचे राष्ट्रपती अभिभाषण आणि अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वीचा अखेरचा असेल. या निमित्ताने देशासमोर आपली, पक्षाची भूमिका मांडण्याची त्यांना संधी होती, असे मोईली म्हणाले. तर, काँग्रेसचे अन्य नेते शशी थरूर यांनी "अच्छे भाषण' म्हणजे "अच्छे दिन नव्हे', असा चिमटा काढला.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते गौरव गोगोई म्हणाले, की भूकंपावरून मोदींनी उपहास केला. त्यामुळे काँग्रेसच नव्हे, तर इतर पक्षांनाही विचित्र वाटले. परंतु सहारा, बिर्ला डायरींच्या निमित्ताने राहुल गांधींनी जे प्रश्‍न उपस्थित केले, त्यावर मोदी बोलले नाहीत. किमान पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी त्यांनी बोलायला हवे होते. जोपर्यंत ते मौन पाळतील तोपर्यंत लोकांच्या मनात शंका राहतील.

Web Title: PM modi's speech is arrogant, says congress