मोदींच्या 'त्या' व्हिडीओसाठी एकाही रुपयाचा खर्च नाही : राठोड

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते. ते स्विकारत मोदींनी योगाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. हा  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा योगासनांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते. ते स्विकारत मोदींनी योगाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. हा  व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. परंतु, हा व्हिडिओ बनविण्यासाठी सरकारने तब्बल 35 लाखांचा चुराडा केल्याचा आरोप काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत केला.

थरुर यांनी ट्विटरवर एक लेख शेअर केला होता. त्याच्याबरोबर योगदिनाच्या जाहिरातीसाठी सरकारने 20 कोटी, तर मोदींच्या व्हिडिओसाठी 35 कोटींचा खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

परंतु, राठोड यांनी या ट्विटला उत्तर दिले आहे. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ करण्यासाठी एकही रुपयाचा खर्च आला नसुन, हा व्हिडिओ पंतप्रधान कार्यालयाच्या व्हिडिओग्राफरने केला असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title: PM Modi's video on yoga day