esakal | जगातील सर्वांत मोठी लोकशाही काळोखात; PM मोदींचा प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश करताना टाइमचे वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

Pm modi

पंतप्रधान मोदींच्या भाजप या हिंदू राष्ट्रवादी पक्षाने उच्चभ्रूवादाबरोबरच विविधतेच्या तत्त्वालाही बाजूला सारले. विशेष म्हणजे यात मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले, असे कार्ल व्हिक यांनी यांनी लिहिलेल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. 

जगातील सर्वांत मोठी लोकशाही काळोखात; PM मोदींचा प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश करताना टाइमचे वक्तव्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेचं प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बॉलिवूडमधील एक अभिनेत्याचाही समावेश आहे. टाइमच्या यादीत भारतीय लोकांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, एड्सवर संशोधन करत असलेले रविंद्र गुप्ता, शाहीनमध्ये आंदोलना करणारे बिल्किस यांची नावे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय इतरही अनेक राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. यात चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिनपिंग, तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग वेन, अमेरिकेच्या निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस, जो बायडन यांचीही नावे टाइमने 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत टाकली आहेत.

जगातील प्रभावी नेत्यांमध्ये मोदींची गणना करताना ‘टाईम’ने त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेभोवती संशयाचे ढग निर्माण झाल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामाची पद्धत लक्षात घेतली तर त्यांना अन्य समुदायाशी काहीही देणेघेणे नाही असे दिसते. देशातील विरोध दाबून टाकण्यासाठी मोदी सरकारला कोरोनाचे निमित्त मिळाले असून जगातील सर्वांत मोठी जिवंत लोकशाही काळोखामध्ये गेली आहे. भारतामध्ये ख्रिस्ती, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन यांच्यासह अनेक धर्म आणि संप्रदाय गुण्यागोविंदाने राहतात असेही ‘टाईम’ने म्हटले आहे. भारतात निर्वासिताचे जीवन जगणारे तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनीही येथील स्थैर्य आणि सौहार्दाचे कौतुक केले असल्याचा दाखला ‘टाईम’च्या लेखात देण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाजप या हिंदू राष्ट्रवादी पक्षाने उच्चभ्रूवादाबरोबरच विविधतेच्या तत्त्वालाही बाजूला सारले. विशेष म्हणजे यात मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले, असे कार्ल व्हिक यांनी यांनी लिहिलेल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी मागील वर्षी मे महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘टाईम’मधील लेखात मोदींना भारताचे ‘डिव्हायडर ऑफ इंडिया’ अशी उपमा देण्यात आल्याने वादंग निर्माण झाला होता.

हे वाचा -.रिया, मुंबई पोलिस आणि BMC ला टार्गेट करणाऱ्या DGP गुप्तेश्वर पांडेय यांची स्वेच्छानिवृत्ती; राजकारणात उतरणार?

बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना यंदाच्या यादीत असेलला एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. त्याने सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. आयुष्यमान खुराना म्हणाला की, टाइम मॅगझिनच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश झाल्यानं अभिमान वाटत आहे. आयुष्यमानच्या या गौरवानंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रतिभावंत कलाकारांमध्ये आयुष्यमानच नाव घेतलं जातं. 2012 मध्ये आलेल्या विकी डोनर या चित्रपटातून त्याने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक हिट चित्रपट आयुष्यमानने केले. गेल्या वर्षी आर्टिकल 15, बाला, ड्रीम गर्ल आणि त्याआधी अंधाधुन हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.