पंतप्रधान मोदी आज राष्ट्राला संबोधित करणार; कारण...

टीम ई-सकाळ
गुरुवार, 19 मार्च 2020

- आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. तसेच तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारत भीतीच्या छायेत आहे. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' केला. त्यादिवशी पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातून देशाला याची माहिती दिली होती. त्यानंतर भारताने सॅटेलाईट विरोधी मिसाईलचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर पुन्हा एकदा मोंदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. मात्र, नोटबंदीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेमुळे अद्यापही अनेकांमध्ये भीती आहे. त्यामुळे आज मोदींचे भाषण असल्याने ते आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाबाबत भाषण असण्याची शक्यता

आता संपूर्ण जगावर  #COVID2019 चे सावट आहे. एका दृष्टीने ही जागतिक आपत्ती आहे. भारत सरकार आणि विविध राज्यांमधील सरकार या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण याच कारणासाठी असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

रात्री आठ वाजता होणार भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून यापूर्वीही भाषण केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांचे भाषण होणार असून, रात्री 8 वाजता ते सर्वांना ऐकायला मिळणार आहे. 

वुहानमध्ये नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi to address nation today