esakal | Coronavirus : आता पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन; ५ एप्रिलला...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : आता पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन; ५ एप्रिलला...

आपल्या दरवाजा किंवा बाल्कनीतून हे सर्व करायचे आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा नियम तोडायचा नाही. कोरोनाची साखळी तोडण्याचा हाच एकमेव पर्याय आहे. 

Coronavirus : आता पंतप्रधान मोदींनी केलं नवं आवाहन; ५ एप्रिलला...

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगात आहे. त्यामुळे याविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जात आहे. त्यानंतर आता त्यांनी देशातील नागरिकांकडे आणखी एक आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी ५ एप्रिल या दिवसाची निवड केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटापासून दूर जाण्याचा सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या काळात देशातील जनतेने मोठे सहकार्य केले. जनतेने २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन केले. त्यानंतर आता येत्या रविवारी म्हणजे पाच एप्रिलला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे आहे. त्याला प्रकाशाच्या शक्तीचे परिचय करुन द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटं द्यायची आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करून बाल्कनी किंवा दरवाजासमोर मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावावी. अंधाराला दूर करून प्रकाश दाखवायचा आहे. त्यामुळे हे सिद्ध होईल की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाहीतर सर्व एकत्र आहोत हे समजणार आहे. 

...पण कोणीही एकत्र येऊ नका

आपल्या दरवाजा किंवा बाल्कनीतून हे सर्व करायचे आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा नियम तोडायचा नाही. कोरोनाची साखळी तोडण्याचा हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे हे करताना कोणीही रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

loading image
go to top