esakal | मोदींनी विचारलं खरंच तुमचं वय 55 आहे का? मिलिंद सोमणने दिलं उत्त
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi and milind soman

फिट इंडिया कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमण, विराट कोहली यांच्याबरोबर प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्याशीही संवाद साधला. तसेच या कार्यक्रमातल देशाभरातून सामान्य नागरिकही सहभागी झाले होते.

मोदींनी विचारलं खरंच तुमचं वय 55 आहे का? मिलिंद सोमणने दिलं उत्त

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: 'तुमच्या वयाबद्दल काहीही म्हणा, पण मला एक प्रश्न आहे की तुमचं वय खरोखरच 55 आहे का त्यापेक्षा कमी आहे.'  हा मजेदार प्रश्न केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता मिलिंद सोमण यांना. आज झालेल्या ‘फिट इंडिया ’मोहिमेच्या ' (Fit India Dialogue) पहिल्या वर्धापन दिनानिमित्त फिटनेसविषयी जनजागृती करणाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी  (PM Narendra Modi) संवाद साधला. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली  (Virat Kohli) आणि अभिनेता आणि फिटनेस मिलिंद सोमण (Milind Soman) यांचा सामावेश आहे. संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमन यांना त्यांच्या फिटनेसबद्दल हा मजेदार प्रश्न विचारला आहे.

पंतप्रधान मोदींचा हा प्रश्न ऐकताच मिलिंद सोमण हसले आणि म्हणाले, 'बरेच लोक मला विचारतात की मी खरोखर 55 वर्षांचा आहे काय?  या वयात मी 500 किमी कसे पळू शकतो याबद्दल त्यांना आश्चर्य वाटतं. यावर मी त्यांना सांगतो की माझी आई 81 वर्षांची आहे तरीसुध्दा अजून ती तंदुरुस्त आहे. यामुळे मीही तसंच राहण्याचा प्रयत्न करतो.' 

वाचा सविस्तर- केंद्र सरकारचे 'हम करे सो कायदा':विरोधकांच्या अनुपस्थितीत राज्यसभेत 2 दिवसांत 15 विधेयकं मंजूर

संवादादरम्यान विराट कोहलीनेही आपल्या फिटनेसचे रहस्य पंतप्रधान मोदी आणि देशातील लोकांशी शेअर केलं. विराट म्हणाला, 'आधी मी चांगली खेळी करण्यासाठी फिटनेस चांगला ठेवायचो, पण आज माझा सराव जरी चुकला तरी काही वाटत नाही पण जर फिटनेस सत्र चुकलं तर वाईट वाटतं.' 

गरीबों का शोषण, ‘मित्रों’ का पोषण, यही है मोदी जी का शासन - राहुल गांधी

फिट इंडिया कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मिलिंद सोमण, विराट कोहली यांच्याबरोबर प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्याशीही संवाद साधला. तसेच या कार्यक्रमातल देशाभरातून सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, डिजिटल माध्यमातून आयोजित केलेल्या 'फिट इंडिया' संवादपर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना तंदुरुस्ती आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन केलं. तसेच त्यांच्या फिटनेस प्रवासाचं अनुभवही सांगितले.

(edited by-pramod sarawale)