PM Modi in Rajya Sabha: "आमचा कर, आमची लस ही कसली भाषा? मोदी कडाडले, रोख कोणाकडे?

PM Modi in Rajya Sabha: "आम्हाला आता जीवनमानाच्या दर्जाकडे लक्ष द्यायचे आहे", पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले आहे.
PM Modi in Rajya Sabha
PM Modi in Rajya SabhaEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "आमचा कर आमचा पैसा, आमची लस, तुमची लस ही तुम्ही कोणती भाषा बोलत आहात. या सरकारचे लक्ष मुलभूत गरजा पुरवणे आणि राहणीमान सुसह्य करण्याकडे आहे. आम्हाला आता जीवनमानाच्या दर्जाकडे लक्ष द्यायचे आहे", असंही पंतप्रधानांनी राज्यसभेत सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'जिथे काँग्रेसचा हात लागेल तिथे बुडणे निश्चित आहे. देशात संभ्रम पसरवू नका. या लोकांनी आपल्या राजकुमाराला स्टार्टअप बनवले आहे आणि तो नॉन स्टार्टर आहे. मी दीर्घकाळ राज्याचा मुख्यमंत्री होतो हे माझे भाग्य आहे, त्यामुळे स्थानिक लोकांच्या आशा-आकांक्षा मला माहीत आहेत. राज्यांच्या विकासातूनच आपण राष्ट्राचा विकास करू शकतो आणि यावर कोणताही वाद होऊ शकत नाही, असंही मोदी आपल्या भाषणात म्हणालेत.

PM Modi in Rajya Sabha
PM Modi in Rajya Sabha : 'मला कोणतेही आरक्षण पसंत नाही, नोकरीत तर नाहीच', PM मोदींनी वाचून दाखवलं नेहरूंचं पत्र

त्याचबरोबर राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे. कोविडच्या काळातही मी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत 20 बैठका घेतल्या. केंद्र आणि राज्यांनी मिळून त्या अडचणीचा सामना केला आणि त्याचे श्रेय घेण्याचा अधिकार राज्यांनाही आहे. आम्ही G20 चे आयोजन दिल्लीत करू शकतो, पण आम्ही राज्यांमध्ये बैठका घेतल्या. सर्व राज्यांत सभा झाल्या, सर्वांना प्रसिद्धी मिळाली. संपूर्ण जगाला आपल्या देशाच्या कानाकोपऱ्याचा संपर्क व्हावा आमचा प्रयत्न आहे, असंही पुढे मोदी म्हणालेत.

PM Modi in Rajya Sabha
PM Modi: LIC बद्दल अफवा कोणी पसरवल्या? एअर इंडिया कोणी बुडवली? BSNL, Maruti बद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

"तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत भाषण करताना काँग्रेस पक्षाचा खरपूस समाचार घेतला आणि काँग्रेस पक्ष कालबाह्य झाल्याचे म्हटले. विरोधकांनी व्यत्यय आणण्यास सुरुवात केल्याने पंतप्रधान मोदी म्हणाले की पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जायचा... आजही तुम्ही न ऐकण्याच्या तयारीत आला आहात. पण. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com