PM Modi: LIC बद्दल अफवा कोणी पसरवल्या? एअर इंडिया कोणी बुडवली? BSNL, Maruti बद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

PM Modi In Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडलेल्या आभार प्रस्तावावर भाष्य केले. आपल्या अभिभाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
PM Modi In Rajya Sabha about LIC, HAL, BSNL, Maruti companies
PM Modi In Rajya Sabha about LIC, HAL, BSNL, Maruti companies Sakal

PM Modi In Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडलेल्या आभार प्रस्तावावर भाष्य केले. आपल्या अभिभाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधानांनी संसदेत सरकारी कंपन्यांची स्थिती सांगितली

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारी कंपन्यांबाबत आमच्यावर आरोप झाले. पण मारुतीच्या स्टॉकचे काय झाले होते ते देशाला माहीत आहे. माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला, माझे विचारही स्वतंत्र आहेत आणि माझी स्वप्नेही स्वतंत्र आहेत.

गुलामगिरीची मानसिकता जगणाऱ्यांकडे दुसरे काही नसते. तोच जुना कागद घेऊन ते फिरत असतात. बीएसएनएल आणि एमटीएनएल बुडवणारे लोक कोण आहेत ते लक्षात ठेवा. एचएएलची दुर्दशा कशामुळे झाली? ही परिस्थिती कोणी निर्माण केली?

लक्षात ठेवा HALला कोणत्या स्थितीत ठेवण्यात आले होते. ज्यांनी HAL संपवली ते HALच्या गेटवर भाषणे करत होते. एअर इंडिया कोणी बुडवली, ही परिस्थिती कोणी आणली? हे सर्वांना माहीत आहे.

PM Modi In Rajya Sabha about LIC, HAL, BSNL, Maruti companies
India Thali Prices: सर्वसामान्यांना मोठा दिलासा; जेवणाची थाळी झाली स्वस्त, काय आहे कारण?

आज HAL ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज HAL विक्रमी महसूल मिळवत आहे. आज HAL ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी बनली आहे. आपल्या सरकारने विकासाचे काम केले आहे. एलआयसीबाबतही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. मला मनापासून सांगायचे आहे की आज LIC चे शेअर्स विक्रमी पातळीवर पोहचले आहेत.

PM Modi In Rajya Sabha about LIC, HAL, BSNL, Maruti companies
Nokia India: नोकिया इंडियाचे प्रमुख बदलले अन् आता 10,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! काय आहे कारण?

PSU कंपन्यांची नेट वर्थ 17 लाख कोटी रुपये झाली

पीएम मोदी म्हणाले, PSU चा निव्वळ नफा 1.25 लाख रुपये होता. आमच्या गेल्या 10 वर्षांत, PSUs ची नेट वर्थ 9.5 लाख कोटी रुपयांवरून 17 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

मेहनत करून आम्ही आमची प्रतिष्ठा खूप वाढवली आहे. सामान्य गुंतवणूकदाराचे नुकसान होईल अशा पद्धतीने बाजारात हवा पसरू नका.

UPA सरकारमध्ये 234 PSU होते, आज 254 PSU आहेत. आम्ही 20 ने वाढ केली आहे. PSU विकल्याचा आरोप करत आहेत मग ही परिस्थिती कशी बदलली? PSU कंपन्या विक्रमी पातळीवर नफा देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com