PM Modi Birthday : 'या' आहेत पंतप्रधान मोदींच्या आवडत्या वस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Birthday

PM Modi Birthday : 'या' आहेत पंतप्रधान मोदींच्या आवडत्या वस्तू

PM Modi favourite Items : पंतप्रधान मोदी वापरत असलेलं पेन, मोबाईल फोन, घड्याळ, कपडे, चष्मा अशा सर्वच गोष्टी वैशिष्टपूर्ण आहे. पण, याविषयी सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निर्णयांसह वेगवेगळ्या गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असतात. पंतप्रधानांच्या आवडीनिवडी खूप खास आहेत. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या खास वस्तूंविषयीची जाणून घेऊया.

हेही वाचा: PM Modi Birthday : जेव्हा तीन मिनिटे उशिरा आल्याबद्दल मागितली होती माफी

मोदींना काय आवडतं?

वैशिष्टयपूर्ण पेहेराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच त्यांच्या वैशिष्टयपूर्ण पेहेरावामुळे चर्चेत असतात. मोदी यांची आवडनिवड आणि छंद खूप खास आहेत. पीएम मोदी यांनी परिधान केलेलं जॅकेट आणि कुर्ता हा नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असतो. त्यांचे कपडे लाखो रुपये किमतीचे असतात. त्यांची वेगळी शैली प्रत्येकाला आवडते.

हेही वाचा: PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वस्तू तुम्हाला हव्यात? असे व्हा लिलावात सहभागी

त्यांचा पेहराव सर्वांची मनं जिंकून घेतो. पीएम मोदी आपल्या कपड्यांबाबत खूपच काटेकोर आहेत. त्यांना राजकीय विश्वात फॅशन आयकॉन मानलं जातं. बरेच लोक त्यांच्यासारखा पेहराव करतात. पीएम मोदी यांचे शूज कपड्यांना मॅच करणारे असतात. ते खूप स्टायलिश शूज वापरतात. हे शूज त्यांची शैली आणि कुर्त्याला साजेसे असतात.

हेही वाचा: PM Modi Birthday: मोंदींविषयी या गोष्टी माहिती आहेत का?

पेनचा संग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बालपणापासून पेनचा संग्रह करण्याचा छंद आहे. ते फाउंटन पेन वापरतात. त्यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात फाउंटन पेन त्यांच्यासोबत कायम राहिलं आहे. मोदी मॉन्ट ब्लँक नावाच्या कंपनीचं पेन वापरतात. या पेनची किंमत १.३० लाख रुपये आहे. बिग बी अर्थात अमिताभ बच्चनदेखील याच कंपनीचं पेन वापरतात.

हेही वाचा: PM Modi Birthday: दिल्लीत '५६ इंच' थाळी; साडे आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

मोदींचा मोबाईल

देशाचे पंतप्रधान म्हटल्यावर मोदी अर्थात चांगलाच मोबाईल वापरत असणार. डिजिटल इंडियाला प्राधान्य देणारे मोदी स्वतः डिजिटली साउंड आहेत. पीएम मोदी सॅटेलाइट किंवा रिस्ट्रिक्टेड एरिया एक्स्चेंजचा फोन वापरतात. हा फोन त्यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी डिझाईन केलेला असतो. फोनच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळणं हा यामागचा उद्देश असतो.

हेही वाचा: Narendra Modi : PM मोदींना वाढदिवसानिमित्त तुम्हीही 'शुभेच्छा' पाठवू शकता; फक्त 'हे' काम करावं लागेल

'या' ब्रँडचे वापरातात घड्याळ

मोदींच्या हातातील घड्याळाकडे तुमचं केव्हातरी लक्ष गेलंच असेल. ते दिखाऊ वस्तूंचा जास्त वापर करत नसले तरी घड्याळ हा त्यांच्या पोशाखाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते हातात घड्याळ घालायला कधीच विसरत नाहीत. मोदी अ‍ॅपल वॉचेस आणि मोव्हाडो ब्रँडची घड्याळं वापरतात.

हेही वाचा: Narendra Modi meets Putin : PM Modi यांनी एसओएस समिटमध्ये पुतीन यांच्याशी काय चर्चा केली

चष्मा

कपडे, पेन, घड्याळ्याव्यतिरिक्त पंतप्रधानांना चष्म्याची देखील विशेष आवड आहे. ते बुलगारी ब्रँडचा चष्मा वापरतात. ते सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार चष्मा बदलतात. अनब्रेकेबल म्हणजे खाली फेकला किंवा पडला तरी फुटणार नाही, असा चष्मा ते वापरतात.

Web Title: Pm Narendra Modi Birthday Favourite Items He Daily Use

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..