Blackmoney परत आणून टॅक्स भरणाऱ्यांना बक्षीस; मोदींचा 'तो' Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Blackmoney परत आणून टॅक्स भरणाऱ्यांना बक्षीस; मोदींचा 'तो' Video Viral

दिल्ली : केंद्र सरकारने मागच्या महिन्यात जीएसटीसाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यामध्ये घर भाड्यासाठी जीएसटी लागू करण्यात आली आहे. दरम्यान मोदींचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून त्यांनी नियमितपणे टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींना आम्ही बक्षीस देणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

(PM Narendra Modi Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओत म्हटलंय की, "आम्ही देशातील काळा पैसा बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी जे जे काय लागेल तेते करणार आहोत. गरज लागली तर आम्ही नवे कायदे बनवू, त्याचबरोबर जो काही काळा पैसा बाहेर येईल त्यातून आम्ही नियमितपणे टॅक्स भरणाऱ्या लोकांना त्यातून बक्षीस देणार आहोत." असं मोदी म्हणत आहेत.

जीएसटीसंदर्भात सरकारने नवे नियम लागू केल्यानंतर आता मोदींचा तो जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नोटबंदीच्या आधीचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एबीपी या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता जीएसटीच्या नव्या नियमावलीनंतर लोकांनी मोदींवर टीका करत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Web Title: Pm Narendra Modi Black Money Tax Return Gift Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..