esakal | पंतप्रधान मोदींसाठीचे बोइंग 777 विमान भारतात दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

pm narendra modi boeing 777 aircraft arrived in Delhi

भारताने अशी दोन व्हीव्हीआयपी विमाने खरेदी केली असून दुसरे विमान लवकरच भारतात आणले जाणार आहे. ही दोन्ही विमाने २०१८ मध्ये एअर इंडियाच्या ताफ्यात होती.

पंतप्रधान मोदींसाठीचे बोइंग 777 विमान भारतात दाखल 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन व्यक्तींच्या सुरक्षित प्रवासासाठी खरेदी केलेले ‘एअर इंडिया वन’ (Air India One) हे विमान आज अमेरिकेहून भारतात दाखल झाले. अमेरिकेतील बोइंग कंपनीकडून खरेदी केलेल्या या बोइंग ७७७-३०० ईआर या प्रकारच्या विमानात भारताने आपल्या गरजेनुसार अनेक सुधारणा केल्या आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

8 हजार 400 कोटी खर्च 
‘एअर इंडिया वन’ विमान जुलैमध्येच भारतात येणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे त्याला दोनदा विलंब झाला. एअर इंडियाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेत जाऊन विमानाचा ताबा घेतला होता. भारताने अशी दोन व्हीव्हीआयपी विमाने खरेदी केली असून दुसरे विमान लवकरच भारतात आणले जाणार आहे. ही दोन्ही विमाने २०१८ मध्ये एअर इंडियाच्या ताफ्यात होती. मात्र, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासात उपयोग करण्यासाठी त्यात बदल करण्याच्या हेतूने ती परत पाठविण्यात आली होती. दोन्ही विमानांची खरेदी आणि त्यातील सुधारणांसाठी भारताला एकूण ८४०० कोटी रुपये खर्च आला. आज हवाई दलाच्या वैमानिकांनीच विमान भारतात आणले. 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

एअर इंडियाचे खासगीकरण
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच  बोइंग ७७७-३०० हे विमान वापरण्यात येणार आहे. सध्या या तीन व्यक्तींसाठी बोईंगचेच बी777 हे विमान सेवेत असते एअर इंडियाचे पायलट या विमानासाठी व्हीआयपींना सेवा देतात. जेव्हा ते व्हीआयपींच्या सेवेत नसतात तेव्हा ते, एअर इंडियाच्या व्यवसायिक विमानांसाठी सेवा देत असतात. सध्या एअर इंडिया सरकारी मालकीची कंपनी असली तरी, ती आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत असलेली कंपनी आहे. एअर इंडियाच्या 100 टक्के खासगी करणाची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियावर 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. सध्या कोरोनाच्या काळात ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.