Modi & Adani Friendship : मोदींसोबत कशी झाली दोस्ती, खुद्द गौतम अदानींनीच सांगितला होता किस्सा

तुम्हाला माहिती आहे का मोदी आणि अदानीचे काय नाते आहे?
Modi & Adani Friendship
Modi & Adani Friendshipsakal

Modi & Adani Friendship : मोदींसोबत कशी झाली दोस्ती, खुद्द गौतम अदानींनीच सांगितला होता किस्सामंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चांगलेच धारेवर घेतले. अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी चांगलीच टिका केली यात राहूल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो दाखवत मोदींवर निशाणा साधला आणि  मोदी आणि अदानी यांचं नातं काय? असा सवाल सुद्धा उपस्थित केला.

राहूल गांधींनी दाखवलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. पण तुम्हाला माहिती आहे का मोदी आणि अदानीचे काय नाते आहे आणि हा फोटो केव्हाचा आहे? यावर थेट अदानी यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. चला तर जाणून घेऊयाच (pm Narendra Modi & businessman Gautam Adani Friendship rahul gandhi showed the photo in loksabha goes viral )

राहूल गांधी यांंनी लोकसभेत अदानी आणि मोदींंची फोटो दाखवत सरकार ताशेरे ओढले यावर अदानींनी मात्र नरमाईची भूमिका घेतली.

अदानी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "राहूल गांधीमुळेच लोकांना अदानी नाव माहिती पडलं. मी राहूल गांधीचा आदर करतो. त्यांनाही देशाची प्रगती हवी आहे. त्यांच्या या वक्तव्याला मी राजकीय वक्तृत्व समजणार.राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. एक व्यापारी म्हणून त्यांच्यावर भाष्य करणं योग्य नाही."

Modi & Adani Friendship
Gautam Adani : हिंडेनबर्ग वादात गौतम अदानींच्या मुलाची उडी; म्हणाला, कर्जाची परतफेड...

मोदींसोबतच्या मैत्रीवर अदानी काय म्हणाले?

अदानी समूहाच्या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असल्याच्या आरोपावर अदानी म्हणाले, "असे आरोप तेच करतात ज्यांना मोदींसोबत प्रॉब्लेम आहे. मोदी जवळपास 12 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मला खूप चांगला अनुभव आला आहे की मोदींकडून तुम्ही कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com