esakal | तिसऱ्या लाटेचा धोका, PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या लाटेचा धोका, PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

तिसऱ्या लाटेचा धोका, PM मोदींनी घेतली उच्च स्तरीय बैठक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या नव्या अवताराने डोके वर काढल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी उच्च स्तरीय बैठक घेऊन महामारीचा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. यामध्ये राज्यांमधील सध्याची स्थिती आणि खबरदारीचा उपाय याची माहिती घेण्यात आली. महाराष्ट्रात आज पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता पाहता राज्य सरकारतर्फे आधीच सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिमेची प्रगती जाणून घेतली. तसेच आरोग्य यंत्रणेला सूचनाही केल्या.

देशातील अर्ध्याहून अधिक सज्ञान लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. तर दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण १८ टक्के आहे. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार आतापर्यंत ७२.३७ कोटी डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा साप्ताहिक सकारात्मकता दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर ३० जिल्ह्यांमध्ये हा दर ५ ते १० टक्के या दरम्यान आहे. यामध्येही केरळ आणि महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. कालच माजी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी, अजून भारतातील कोरोनाची दुसरी लाट संपली नसल्याकडे लक्ष वेधले होते.

हेही वाचा: राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

त्यापार्श्‍वभूमीवर आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी, संसर्गाचा धोका लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. असे केल्याने पुढील वर्षी नव्या उत्साहाने आणि आणखी भव्यतेने उत्सव साजरा करता येईल, अशी टिप्पणी आज केली.

loading image
go to top