नरेंद्र मोदींनी दिल्या 'लोकशाही अमर रहे'च्या घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण होत असताना भाजपतर्फे आज (मंगळवार) मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणी आणि लोकशाही यावर बोलताना काँग्रेसवर टिका केली. मात्र भाषणाचा शेवट करताना त्यांनी दिलेल्या लोकतंत्र अमर रहे या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह नागरिकांनाही त्यांनी घोषणा देण्यास सांगितले.

मुंबई : 1975 साली इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला 43 वर्षे पुर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी आणि काँग्रेसवर जोरदार टिका केली. मात्र यावेळी त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना 'लोकतंत्र अमर रहे..' ही घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेवरुनच सोशल मिडीयावर मोदींवर टीका करण्यात येत आहे.

आणीबाणीला 43 वर्षे पूर्ण होत असताना भाजपतर्फे आज (मंगळवार) मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणी आणि लोकशाही यावर बोलताना काँग्रेसवर टिका केली. मात्र भाषणाचा शेवट करताना त्यांनी दिलेल्या लोकतंत्र अमर रहे या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह नागरिकांनाही त्यांनी घोषणा देण्यास सांगितले.

या घोषणेवरून मोदींना सोशल मिडीयावर लक्ष्य करण्यात आले. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आठवणी जिवंत ठेवण्यासाठी अमर रहे ही घोषणा दिली जाते, असे टिका करणाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे आपल्या देशातील लोकशाहीचा मृत्यू झाला आहे का? असा प्रश्न सोशल मिडीयावर विचारला जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते घनश्याम तिवारी यांनीही मोदींच्या या घोषणेवर निशाणा साधत मोदींच्या मते लोकशाहीचा मृत्यू झाला आहे का? असा प्रश्न केला.

Web Title: PM Narendra Modi chants democracy amar rahe