esakal | PM मोदींनी लालकृष्ण अडवाणींना दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा
sakal

बोलून बातमी शोधा

modi advani main.jpg

पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनीही अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

PM मोदींनी लालकृष्ण अडवाणींना दिल्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्म अडवाणी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी अडवाणींना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबर देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे श्रद्धेय श्री लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. ते पक्षाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांसह संपूर्ण देशवासीयांचे प्रेरणास्त्रोत आहेत. मी त्यांच्या दीर्घाआयु आणि सुदृढ जीवनासाठी प्रार्थना करतो. 

पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनीही अडवाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, जनसंघ, भाजपचे महान नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी निरोगी राहावेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अडवाणींना शुभेच्छा दिल्या. भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले. 

हेही वाचा- US President Election : जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?

हेही वाचा- US President Election : जाणून घ्या कोण आहेत जो बायडेन?