esakal | बायडेन यांच्या विजयानंतर मोदींकडून शुभेच्छा; हॅरिस यांचेही अभिनंदन
sakal

बोलून बातमी शोधा

modi congratulate to joe biden after winning us election

जो बायडेन यांचा विजय झाल्यानंतर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. 

बायडेन यांच्या विजयानंतर मोदींकडून शुभेच्छा; हॅरिस यांचेही अभिनंदन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतमोजणी पूर्ण झाली असून डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी विजय मिळवला आहे. जो बायडेन यांना 290 इलेक्टोरल मते मिळाल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. त्यामुळे आता बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जो बायडेन यांचा विजय झाल्यानंतर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचे ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, जबरदस्त विजयाबद्दल जो बायडेन तुमचे अभिनंदन, उपराष्ट्रपती असताना भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यामध्ये तुमचे महत्त्वाचे योगदान होते. मी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आणखी दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्यासोबत काम करण्याची आशा व्यक्त करतो. 

कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती होणार आहेत. त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की, तुमचं यश ऐतिहासिक आहे. तुमच्यासाठीच नव्हे तर भारतीय अमेरिकन लोकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मला विश्वास आहे की तुमचा पाठिंबा आणि नेतृत्वाच्या जोरावर भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी चांगले होती. 

हे वाचा - 'We Did It Joe', बायडेन यांना कमला हॅरिस यांचा कॉल; शेअर केला VIDEO

बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात दोनदा उपाध्यक्षपदी राहिलेल्या बायडेन यांनी १९८७ आणि २००८ असे दोनदा अध्यक्षपदासाठी लढण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नांत ते त्यांनी हाशील केले. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत एकही महिला उपराष्ट्रपती झाली नव्हती. त्यामुळे कमला हॅरिस या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरणार आहेत.