मोदी भेकड, चर्चेपासून पळ काढतात : राहुल गांधी

मोदी भेकड, चर्चेपासून पळ काढतात : राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक भेकड व्यक्ती आहे. त्यामुळेच ते राष्ट्रीय सुरक्षा चर्चेपासून पळ काढत आहेत. ते आता कोणतीही चर्चा होऊ देत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आज (गुरुवार) टीकास्त्र सोडले.

नवी दिल्ली येथे आयोजित 'आयएसीसी'च्या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा आणि राफेल करारावर चर्चा करावी, यासाठी मी त्यांना खुले आव्हान देतो. या मुद्यांवर चर्चा झाल्यास पंतप्रधान मोदी चर्चेपासून पळून जातील. भारतातील संस्था कोणत्याही पक्षाची निगडित नसते. ती निगडित असते ती म्हणजे देशाशीच. त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, भाजपची सत्ता आहे असे, जरी असले तरीही प्रत्यक्षात देश संघ चालवतो, हे वास्तव आहे. मोदी सरकारचा 'रिमोट कंट्रोल' सरसंघचालक मोहन भागवतांकडे आहे. या अशा सरकारला उलथवून टाका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

दरम्यान, राहुल गांधी बोलत असताना ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देण्यात आला होत्या.

न्यायाधीशांची पत्रकार परिषद लाजिरवाणी बाब

सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी आम्हाला काम करू दिले जात नसल्याचा आरोप केला होता. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com