esakal | पंतप्रधान मोदींनी PM केअर्स निधीतून ३५ ऑक्सिजन प्लांटचे केले लोकार्पण | India
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

पीएम केअर्स अंतर्गत देशातील ३५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींनी PM केअर्स निधीतून ३५ ऑक्सिजन प्लांटचे केले लोकार्पण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील ऋषिकेष एम्समध्ये ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केले. यावेळी मोदींनी एम्समधून व्हर्च्युअल माध्यमातून देशभरातील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील ३५ ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण केले. पीएम केअर्स अंतर्गत देशातील ३५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत गोळीबार; दोन शिक्षकांचा मृत्यू

मोदी म्हणाले की, देशातील राज्यांमध्ये ३५ ऑक्सिजनचे प्लांटचे लोकार्पण करणं हे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. एक जागतिक दर्जाची लॅब सुरु केल्यापासून ते ३ हजार लॅब पर्यंतचा प्रवास आपण केला आहे. आपण एकेकाळी औषधांसाठी इतरांवर अवलंबून होतो. पण आज आपण औषधांची निर्यात करत असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

आजपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. पहिल्याच दिवशी माँ शैलपुत्रीची पूजा केली जाते. माँ शैलपुत्री ही हिमालयाची कन्या आहे. यादिवशीच मी उत्तराखंडमध्ये आहे, इथं येण्याची संधी मला मिळाली, हिमालयाच्या या धरतीला वंदन करता आलं यापेक्षा मोठं काय असू शकतं अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.

मोदी म्हणाले की, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना आपण ज्या धैर्याने करत आहे ते जग पाहतंय. कोरोनाच्या लढाईत कमी वेळात भारताना सुविधा निर्माण केल्या. यातून भारताची ताकद दिसून येते. आतापर्यंत भारताने ९३ कोटी कोरोना डोस दिले आहेत. लवकरच १०० कोटींवर हा आकडा जाईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

loading image
go to top