काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याची राम मंदिराला देणगी; PM मोदींना लिहिलं खास पत्र 

ram mandir
ram mandir

भोपाळ- काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) निर्माणासाठी एक लाख अकरा हजार अकराशे अकरा रुपये देणगी दिली आहे. दिग्विजय सिंहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्या माध्यमातून श्री राम जन्मभूमी ट्रस्टला चेक पाठवला आहे. चेकसोबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आवाहन केलंय की, देणगी गोळा करण्याचे काम सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवं. त्यांची असंही म्हटलं की विश्व हिंदू परिषदेने याआधी झालेल्या देणगीचा लेखा-जोखा जनतेसमोर ठेवायला हवा. 

Corona Vaccination: मुंबईत आजपासून पुन्हा कोरोना लसीकरणास सुरुवात

आपल्या पत्रामध्ये दिग्विजय सिंहांनी म्हटलंय की, विश्व हिंदू परिषदेने 15 जानेवारी 2021 मध्ये राम मंदिर निर्माणासाठी संपूर्ण देशात देणगी अभियान सुरु केले आहे. याआधीही विश्व हिंदू परिषदेने आणि अन्य हिंदू संघटनांनी देणगी अभियान सुरु केले होते. विहिपने या देणगीचा लेखा-जोखा द्यायला हवा. 
         
दिग्विजय सिंहांनी पत्रात मंदिर निर्माणासाठी बनवण्यात आलेल्या समितीत शंकराचाऱ्यांना सामिल करण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. धर्म हा खाजगी आस्थेचा विषय आहे, जो मन, वचन आणि कर्मांना पवित्र करुन आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करतो. त्यामुळे स्वत:च्या धार्मिकतेचे प्रदर्शन करणे अहंकाराचे प्रतिक आहे. जे आत्मकल्याण आणि लोककल्याणाच्या मार्गातील अडथळा ठरु शकते. भगवान राम माझे आणि माझ्या पूर्वजांच्या आस्थेचे केंद्र आहेत. त्यामुळे रामाशिवाय मी माझ्या अस्तित्वाचीही कल्पना करु शकत नाही, असं ते म्हणाले आहेत. 
      
Corona Vaccination: आतापर्यंत 3.8 लाख लोकांना लस; 580 जणांवर साईड इफेक्ट्स

मध्य प्रदेशच्या राघोगडमधील माझ्या घऱी 400 वर्ष जूने भगवान रामाचे मंदिर आहे, जेथे दररोज त्यांची पूजा होते. माझ्या रक्ताच्या थेंबा-थेंबात राम आहेत. पण मी कधीही रामाचे नाव राजकारणासाठी वापरले नाही, असं म्हणत दिग्विजय सिहांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, काही लोक काठी, तलवार, हत्यारे घेऊन राम मंदिरासाठी देणगी मागत आहेत. देणगीसाठी हत्यार घेऊन एका समाजाला भडकवण्यासाठी नारे देणे चुकीचे आहे. मध्य प्रदेशात यामुळे तीन अप्रिय घटना घडल्या आहेत. तसेच अन्य ठिकाणी अशा घटना घडण्याची शक्यता आहे.

पत्रात दिग्विजय सिंह नरेंद्र मोदींना म्हणालेत की, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. तुम्हाला माहितेय की राम मंदिराच्या निर्माणासाठी कोणत्याही समाजाचा विरोध नाही. त्यामुळे तुमची जबाबदारी आहे की देगणी गोळा करण्याचे काम सौहार्दपूर्ण वातावरणात व्हायला हवं. जे लोक हिंसा उकसवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशांवर रोख आणायला हवी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com