
पंतप्रधान मोदी 3 दिवस युरोप दौऱ्यावर; जर्मनीच्या चान्सरलसोबत आज चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांचा दौरा करणार आहेत. रशिया युक्रनेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
(PM Narendra Modi Europe Visit)
रशिया युक्रेन युद्धात भारताच्या भूमिकेवरुन पाश्चात देशांनी नाक मुरडली आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फॅड्रिक्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या भेटी घेणार आहेत. प्रत्येक देशात ते एक एक दिवस थांबणार आहेत. तसेच रशिया युक्रेन प्रश्नावर ते युरोपीय देशांशी थेट संवाद साधणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. युक्रेन प्रश्नाव्यतिरिक्त या भेटीत उर्जा, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रांच्या संबंधित द्वीपक्षीय चर्चा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: वाहतुकीचे नियम मोडल्याचा नेत्यांना फटका; राज ठाकरेंसह अनेकांना हजारोंचा दंड
सध्याच्या युक्रेन आणि रशिया युद्ध कसं सोडवलं जाईल याकडे पाश्चात्य देशांचे लक्ष लागलेले असताना भारताची भूमिका तटस्थ आहे त्यामुळे भारताच्या भूमिकेवरुन चर्चा होणार आहे. जर्मनी आणि फ्रान्स कडून हे युद्ध थांबवण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. आता मोदी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी थेट संवाद साधणार आहेत. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी थेट संवाद साधत ते आपली भूमिका स्पष्ट करतील असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान मोदी सध्या जर्मनीमध्ये पोहोचले असून जर्मनीच्या चान्सलरने त्यांची भेट घेतली आहे.
Web Title: Pm Narendra Modi Europe Tour Three Country Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..