esakal | PM मोदींकडून आजी-माजी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा; रुपाणींना म्हणाले, 'तुम्ही...'
sakal

बोलून बातमी शोधा

PM मोदींकडून आजी-माजी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा; रुपाणींना म्हणाले, 'तुम्ही...'

PM मोदींकडून आजी-माजी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा; रुपाणींना म्हणाले, 'तुम्ही...'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गांधीनगर: गुजरातमध्ये गेल्या तीन दिवसांत मोठ्या राजकीय उलथापालथी पहायला मिळाल्या. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानकपणे राज्यपालांना आपला राजीनामा सोपवल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली दिसून आल्या. त्यानंतर गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतच्या जर-तरच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर काल भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत भुपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री पद सोपवण्यात आलं. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

हेही वाचा: पहिल्याच आमदारकीत मुख्यमंत्री; भूपेंद्र पटेलांनी घेतली शपथ

त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुपेंद्र पटेल यांचं अभिनंदन केलं आहे. आज भुपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मोदींनी त्यांना सदिच्छा देताना म्हटलंय की, मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि मी त्यांचं नमुनेदार काम पाहिलं आहे; मग ते भाजप संघटनेत असो किंवा नागरी प्रशासन आणि समाजसेवेमध्ये असो! ते गुजरातच्या विकासाचा मार्ग नक्कीच आणखी समृद्ध करतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

मावळत्या मुख्यमंत्र्यांनाही दिल्या सदिच्छा

तसेच पंतप्रधान मोदींनी विजय रुपाणींना देखील सदिच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विजय रुपणांनी लोकोपयोगी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अविरतपणे काम केलं आहे. मला खात्री आहे की, ते येणाऱ्या काळात देखील लोकांच्या सेवेमध्ये आपलं योगदान देत राहतील.

हेही वाचा: मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार १०० कोटींचा दावा

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला अवघ्या वर्षभराचा कालावधी बाकी आहे. त्याआधीच पहिल्या आमदारकीत भुपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री पद मिळालं आहे. गुजरातमध्ये झालेला हा मोठा राजकीय फेरबदल म्हटला जातोय. भुपेंद्र पटेल यांनी आज दुपारी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भुपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या शपथविधी सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा हजर आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी भुपेंद्र पटेल यांनी अहमदाबादच्या स्वामीनारायण मंदिरात 'गौ पूजा' केली.

loading image
go to top