मोदींनी पाकला दिली आणखी एक संधी-मुफ्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

जम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीपूर्ण वातावरण, शांतता आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी पाकिस्तानला आणखी एक संधी दिल्याचे, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

जम्मूमध्ये एका सभेत बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी गरिबीविरोधात संयुक्त लढाई लढण्याची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी गरिबीविरोधात लढण्यासाठी शेजारी देश पाकिस्तानला एक संधी दिली आहे. त्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. अशी संधी पुन्हा-पुन्हा येत नाही.

मुफ्ती म्हणाल्या की, गरिबीविरोधातील युद्धात मोदींना पाकिस्तान आणि तेथील जनतेने आव्हान देण्यात अर्थच नाही. पाकिस्तानने याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पठाणकोट हल्ल्यानंतरही मोदी शांततेसाठी लाहोरला गेले. पण, पाकिस्तानने उरी हल्ला घडवून आणला. मोदी त्यांनी संधी देत आहेत, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.

Web Title: PM Narendra Modi gave one more chance to Pakistan