
नवी दिल्ली : आज दशकातील शेवटचे सूर्यग्रहण दिसले. पण देशातील अनेक राज्यात ढगाळ वातावरणामुळे ग्रहण दिसू शकले नाही. याच वातावरणाचा फटका पंतप्रधान मोदींनाही बसला. तेही सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते, मात्र त्यांनाही ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण दिसू शकले नाही, त्यांनी ही खंत ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
तसेच मोदींनी एक रिट्विट केले आहे, यात आता त्यांचा हा फोटो मीम्स बनणार आहे, असे कॅप्शन लिहिले आहे. त्यांनी हे ट्विट रिट्विट करत म्हणले आहे की 'Most welcome....enjoy :)'
मोदींनी या ट्विटमध्ये त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्या फोटोंवरून ते ट्रोल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये त्यांनी जो चष्मा वापरला आहे त्याच्या किंमतीवर आता चर्चा होत आहे. हा चष्मा The Artist III या कंपनीचा असून तो 1 लाख 55 हजारांचा असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची वर बघत उभी राहण्याची स्टाईल व त्यांचे ट्विट यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
या ट्विटमध्ये मोदींनी ग्रहणाचा चष्मा लावून फोटो शेअर केला आहे. तर तज्ञ्जांशी चर्चा करतानाचे व लाईव्ह स्ट्रिमिंगचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
साधी राहणी असलेले मोदी इतका महागडा चष्मा कसा काय वापरतात असे सवाल नेटकरी करत आहेत. तर ज्यांनी देशाला ग्रहण लावले, तेच आता ग्रहण बघत आहेत अशीही टीका मोदींवर होत आहे.
तर दुसऱ्या बाजूला ट्विटरवर #CoolestPM असा हॅशटॅग सुरू झालाय. ज्यात मोदींच्या पाठिंब्याची ट्विट्स नेटकऱ्यांनी केली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.