Air Force Day : पंतप्रधान मोदींनी शेअर केला प्रेरणादायी व्हिडिओ 

वृत्तसंस्था
Tuesday, 8 October 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक स्पेशल व्हिडिओ शेअर केलाय. त्या त्यांनी हवाई दलाच्या कामगिरीचं त्यांच्याच शब्दांत कौतुक केलंय. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ज्याचे आकर्षण असते त्यात हवाई दलाच्या कसरतींचा समावेश असतो.

नवी दिल्ली : आज भारतात हवाई दल दिवस साजरा केला जात आहे. या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तमाम भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या हवाई दलाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक स्पेशल व्हिडिओ शेअर केलाय. त्या त्यांनी हवाई दलाच्या कामगिरीचं त्यांच्याच शब्दांत कौतुक केलंय. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ज्याचे आकर्षण असते त्यात हवाई दलाच्या कसरतींचा समावेश असतो. एकवीसाव्या शतकातील सर्वांत शक्तीशाली हवाई दलांमध्ये भारताच्या हवाई दलाचा समावेश असल्याचं पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. भारताने आजवर केलेल्या युद्धांमध्ये हवाई दलाने मोलाची भूमिका बजावली आहे. हवाई दलातील प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना मी आज हवाई दल दिवसाच्या शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदींनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

काय आहे हवाई दल दिवस?
भारतात इंग्रजांच राज्य असताना 8 ऑक्टोबर 1932 रोजी हवाई दलाची स्थापना झाली. त्यानंतर 8 ऑक्टोबर हा दिवस हवाही दल दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय हवाई दलाने दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेशात जपानच्या हवाई दलाविरुद्ध यशस्वी एअरस्ट्राईक केला होता. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धांमध्ये भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या वर्षी पुलवामामध्ये निमलष्करी दलाच्या पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कथित दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करून एअरस्ट्राईक केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi gives wishes on air force day twitter social media