
पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला असून, जगभरातून टीकेची झोड उठली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना निधन झाल्याचे वृत्त दिले आणि एकच खळबळ उडाली.
इस्लामाबाद: पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला असून, जगभरातून टीकेची झोड उठली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना निधन झाल्याचे वृत्त दिले आणि एकच खळबळ उडाली.
पाकमध्ये तबलिगींमुळे उडालाय हाहाकार...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाचा संसर्ग झाला असून, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीने खोट्या बीबीसी अकाऊटच्या हवाल्याने बोरिस जॉन्सन यांचे निधन झाल्याचे वृत्त प्रसारित केले. या बेजबाबदारपणासाठी या वृत्तवाहिनीवर आता टीकेची झोड उठली आहे.
Dawn News TV aired a breaking news today that British Prime Minister #BorisJohnson passed away due to #Covid_19. They even quoted a fake BBC World account from Twitter which had hardly a few hundred followers. Smoking some next level shit. pic.twitter.com/J0BopcINB7
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) April 7, 2020
पाकिस्तानमधील पत्रकार वझाहत काझमी यांनी या वृत्तांकनाचा व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. “डॉन न्यूज या वृत्तवाहिनीने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे करोनामुळे निधन झाल्याचे वृत्त ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रसारित केले. त्यांनी हे वृत्त देताना बीबीसी वर्ल्डच्या खोट्या ट्विटर अकाऊंटचा संदर्भ दिला. या अकाऊंटला अवघे काही शेकडो फॉलोअर्स आहेत,” असे काझमी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये ‘करोना व्हायरस के कारण ब्रिटन के वझीरे आझम बोरिस जॉन्सन इंतकाल हो गये है,’ असं बातम्या वाचणारी वृत्तनिवेदिका सांगताना दिसत आहे.