Video : बुंदेलखंड एक्सप्रेस वे वर 15 हून अधिक उड्डाणपूल अन् बरचं काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bundelkhand Expressway

Video : बुंदेलखंड एक्सप्रेस वे वर 15 हून अधिक उड्डाणपूल अन् बरचं काही

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज बुंदेलखंड एक्सप्रेस (Bulndelkhand ExpressWay) वे चे उद्घाटन करण्यात आले. हा महामार्ग 296 किमीचा असून यामुळे दिल्ली ते चित्रकूटपर्यंतचे अंतर केवळ सहा तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी यासाठी साधारण 12 ते 14 तास लागत होते. अंतर कमी होण्याबरोबरच या एक्सप्रेस वे ची इतरदेखील वैशिष्ट्ये आहेत. जसे की, या महामार्गाच्या जमीन खरेदी करण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यावर 15 हून अधिक उड्डाणपूल, 10 हून अधिक मोठे पूल, 250 हून अधिक छोटे पूल, 6 टोल प्लाझा आणि चार रेल्वे पूल आहेत. (Bundelkhad Express Way News In Marathi)

उद्घघाटन प्रसंगी मोदी म्हणाले की, बुंदेलखंडच्या (Bundelkhand) विकासात येथील कुटीर उद्योगांचीही मोठी ताकद आहे. स्वावलंबी भारतासाठी या कुटीर परंपरेवरही आपले सरकार भर देत असून, मेक इन इंडिया या कुटीर उद्योगांमुळे सशक्त होणार आहे. एक्सप्रेस वे च्या निर्मितीनंतर आता हे सरकार बुंदेळखंडमधील प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन मिशनवर काम करत आहोत. देशाला हानी पोहोचवणारी, देशाच्या विकासावर परिणाम करणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला दूर ठेवायची आहे.

हेही वाचा: हीच ती वेळ! जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहतेय: आदित्य ठाकरे

आमच्या सरकारने गोरखपूर एम्सची पायाभरणीही केली आणि त्याचे उद्घाटनही आमच्या सरकारमध्येच झाले. दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेची पायाभरणी आणि उद्घाटन दोन्ही आमच्या सरकारमध्ये झाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. बुंदेलखंड द्रुतगती मार्ग हे देखील याचे उदाहरण आहे. त्याचे काम पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार होते, परंतु ते 7-8 महिने आधीच सेवेसाठी सज्ज झाले आहे. एकेकाळी यूपीमध्ये फक्त 12 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज यूपीमध्ये 35 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि 14 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम सुरू आहे.

हेही वाचा: सोनिया गांधींनी आपल्याच तिजोरीतून तिस्ता सेटलवाडला दिले पैसे, भाजपचा आरोप

आज देश ज्या विकासाच्या प्रवाहावर चालत आहे त्याच्या गाभ्यामध्ये दोन पैलू आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. एक म्हणजे हेतू आणि दुसरी मर्यादा. आम्ही देशाच्या वर्तमानासाठी केवळ नवीन सुविधा निर्माण करत नाही तर देशाचे भविष्य घडवत असल्याचे मोदी म्हणाले. बुंदेलखंड एक्स्प्रेस वेने चित्रकूट ते दिल्ली हे अंतर 3-4 तासांनी कमी झाले असले तरी, त्याचा फायदा त्याहून अधिक असल्याचे पीएम मोदी म्हणाले. या एक्स्प्रेस वेमुळे येथील वाहनांना वेग तर मिळेलच, पण त्यामुळे संपूर्ण बुंदेलखंडच्या औद्योगिक प्रगतीलाही गती मिळेल असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा: चीनने LAC वर बसवला 5G टॉवर; लडाखमधील नागरिकांमध्ये अस्वस्थता

रेवडी संस्कृतीपासून सावध रहणे गरजेचे

पंतप्रधान म्हणाले की, आजकाल आपल्या देशात मोफत रेवडी वाटून मते गोळा करण्याची संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही रेवाडी संस्कृती देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक आहे. देशातील जनतेला या रेवडी संस्कृतीपासून खूप सावध राहावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Pm Narendra Modi Inaugurates Bundelkhand Expressway In Jalaun

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top