Narendra Modi Interview: 'प्राण जाये पर वचन ना जाये'; गॅरंटीच्या घोषणेबाबत पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली भूमिका

Narendra Modi interview with ANI: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केलं
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर भाष्य केलं. लोकशाही येणाऱ्या पिढीच्या हृद्यात आहे. काँग्रेसचे पाच-सहा दशकाचं काम आहे. माझा कार्यकाळ फक्त दहा वर्षांचा राहिला आहे. पण, प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळेपण दिसून येत आहे. देशवासियांनी संधी दिल्यामुळे आपण फक्त देश हे एकवेळ ध्येय ठेवले पाहिजे, असं मोदी म्हणाले.

देशातील कोणालाही घाबरण्याचं काम नाही. माझे निर्णय हे देशाच्या कल्याणासाठी आहेत. मी वेळ घालवणार नाही. जास्तीत जास्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण, मला आणखी खूप काही करायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून मी म्हणतो की हा केवळ एक ट्रेलर आहे. अजून मला खूप काही करायचं आहे, असं ते म्हणाले. (pm narendra modi interview with ani loksabha election bjp 2024)

Narendra Modi
PM Narendra Modi : ‘संकल्पपत्रा’तून विकासाची गॅरंटी; भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध; गरीब, युवक, शेतकरी, महिला केंद्रस्थानी

वारंवार निवडणुका, आचारसंहिता, कोणत्याही राज्यात निवडणुका असल्यास अनेक अधिकारी दुसऱ्या राज्यात पाठवले जायचे. त्यामुळे मुख्यमंत्री असताना मला याची अडचण जाणवली. त्यामुळे एकत्र निवडणूक घेण्याचा आमचा प्लॅन आहे, असं मोदी म्हणाले. प्राण जाये पर वचन ना जाये अशी आमची परंपरा आहे. दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. त्यामुळेच मोदी कि गॅरंटी अशी आमची घोषणा आहे, असं ते म्हणाले.

राम मंदिराचा मुद्दा आधीच्या पक्षांना सोडवता आला नाही. आम्ही तो प्रश्न सोडवला. राम मंदिर बनल्याने काही धोका निर्माण झाला नाही. त्यांनी याबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती. राम मंदिर हा त्यांच्यासाठी राजकारणाचा मुद्दा आहे. राम मंदिर झाले, त्यामुळे त्यांचा मुद्दा संपला. याच रोषातून ते टीका करत असतात, असं मोदी म्हणाले.

Narendra Modi
PM Modi Interview : ''मी मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं होतं'' ईडी कारवायांवरुन मोदी थेटच बोलले

राम मंदिराच्या काळात ११ दिवसांचे अनुष्ठान केलं. जमिनीवर झोपत होतो, नारळाच्या पाण्यावर जगत होता. दक्षिणेत जाऊन कंब रामायणाचा मी पाठ केला. पंतप्रधान म्हणून नाही, तर एक रामभक्त म्हणून राम मंदिर सोहळ्याला सामोरे गेलो. मला पाचशे वर्षांचा संघर्ष दिसत होता, असं ते म्हणाले. (Narendra Modi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com