वाजपेयी यांच्या स्मृतीनिमित्त 100 रूपयांचे नाणे जारी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 डिसेंबर 2018

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आज (ता.24) 100 रूपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या कामचे कौतुक केले. वाजपेयी आपल्या सार्वजनिक आयुष्यात दिर्घ काळ विरोधी पक्षात होते, तरीही त्यांनी नेहमी देशहिताच्या विषयांवर आवाज उठवला, असे मोदी यावेळी म्हणाले.

नवी दिल्ली- दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आज (ता.24) 100 रूपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या कामचे कौतुक केले. वाजपेयी आपल्या सार्वजनिक आयुष्यात दिर्घ काळ विरोधी पक्षात होते, तरीही त्यांनी नेहमी देशहिताच्या विषयांवर आवाज उठवला, असे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, काही लोकांना सत्ता ऑक्सिजनसारखी आहे. त्यांना सत्तेशिवाय राहवत नाही. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की, सिद्धांत आणि कार्यकर्त्यांच्या बळावर अटलजींनी इतकी मोठी राजकीय संघटना उभा केली. अटलजींनी लोभ आणि स्वार्थाशिवाय लोकशाहीला सर्वोच्च स्थानी ठेवले. आज अटलजी आपल्यात नाहीत, हे मी मानण्यास तयारी नाही. अटलजी समाजातील सर्व वर्गावर प्रेम करणारे व्यक्ती होते. ते आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट वक्त्यांपैकी एक होते, असेही यावेळी मोदींनी म्हटले.

Web Title: Pm Narendra Modi Issued Memorial 100 Rupee Coin In The Remembrance Of Pm Atal Bihari Vajpayee 94th Birth Anniversary