

Modi shares an old media anecdote on Diwali Milan
esakal
New Delhi: बातमी देणे हे पत्रकारांचे कर्तव्यच असते; पण एकदा पत्रकारांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची बातमी दिली होती! ‘तुम्ही आता गुजरातचे मुख्यमंत्री होणार आहात, मिठाई खाऊ घाला,’ असे म्हणत पत्रकारांनी मोदींकडे मिठाईची मागणी केली होती. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात हा मजेशीर किस्सा सांगत मोदी यांनी धमाल उडवून दिली.