दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला परदेश दौरा

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जून 2019

मालदीवमध्ये मोदी तेथील संसदेमध्येही भाषण करणार असून यासाठी मालदीवच्या संसदेने तसा प्रस्तावही मंजूर केला आहे.

नवी दिल्ली : शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या भारताच्या धोरणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. 8) मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत.

पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकाल सुरु झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मालदीवनंतर ते श्रीलंकेलाही जाणार आहेत. या दौऱ्यामुळे या दोन्ही देशांबरोबर असलेले आमचे जवळचे संबंध आणि भागीदारी अधिक दृढ होईल, असा विश्‍वास मोदींनी आज व्यक्त केला.

मालदीवमध्ये मोदी तेथील संसदेमध्येही भाषण करणार असून यासाठी मालदीवच्या संसदेने तसा प्रस्तावही मंजूर केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi to leave for first foreign trip of 2nd term