मोदी आज पुन्हा बोलणार आठ वाजता; सर्वांना उत्सुकता

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

यापूर्वी पंतप्रधानांनी 27 मार्च रोजी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. त्यात त्यांनी भारताने क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री आठ वाजता (गुरुवारी) राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत.

या वेळी ते जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतला, याबाबत निवेदन करण्याची शक्‍यता आहे. संसदेने कालच जम्मू-काश्‍मीरसाठीचे "कलम 370' रद्द करण्यावर शिक्कामोर्तब केले; तसेच जम्मू-काश्‍मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करण्यासही मान्यता दिली. 

यापूर्वी पंतप्रधानांनी 27 मार्च रोजी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. त्यात त्यांनी भारताने क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे जाहीर केले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi likely to address nation on Thursday