ओमिक्रॉनचा धोका : मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राची उद्या महत्वपूर्ण बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi

ओमिक्रॉनचा धोका : मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राची उद्या महत्वपूर्ण बैठक

दिल्ली : देशातील वाढती ओमिक्रॉनच्या (Omicron Cases In India) रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi likely to chair key meeting tomorrow on Omicron cases) उध्यक्षतेखाली उद्या एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील ओमिक्रॉनची रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून ही संख्या आता 216 च्या घरात पोहचली आहे. (Omicron Count In India )

दरम्यान, ओमिक्रॉन विषाणू यापूर्वी आलेला डेल्टा व्हेरिएंटपेक्षा (Omicron Is more active than Delta variant) तिपटीने पसरणारा आहे, त्यामुळे रूग्णसंख्या झापाट्याने वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे संभव्य धोका लक्षात घेत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यात ओमिक्रॉन विषाणूला तोंड देण्यासाठी पुन्हा वॉर रूम तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी वॉर रूम (War Room For Omicron) पुन्हा सक्रिय करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्बंध लावण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.

याशिवाय जिल्हा स्तरावर कोविड-19 मुळे प्रभावित लोकसंख्या, भौगोलिक प्रसार, रुग्णालयातील पायाभूत सुविधा आणि त्याच्या संदर्भात उदयोन्मुख डेटाचा सातत्याने आढावा घेणे गरजेचे आहे असे देखील केंद्राने राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, देशातील वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्या घेण्यात येणाऱ्या बैठकीत नेमकी कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा होते आणि नव्याने कुठले निर्बंध लावले जातात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.