Omicron India : काळजी घ्या! देशात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

आतापर्यंत 90 रुग्ण बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काळजी घ्या! देशात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशातील ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. दैनंदिन वाढणाऱ्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. चार दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली असून आज ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा २१३ वर (India Omicron Cases) पोहोचला आहे. दरम्यान, आणखी दोन राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण समोर आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ३ आणि ओडिशात २ रुग्ण आढळून आले आहेत. देशभरात (India) ही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य (health minister) मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 90 बऱ्या झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

१७ डिसेंबरला ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १०१ होती. त्यानंतर १९ डिसेंबरला त्यात भर पडून रुग्णसंख्या १२६ वर पोहोचली. सध्या देशात ओमिक्रॉन (Omicron Cases) रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्र (Maharashtra) आणि दिल्लीत आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रात अनुक्रमे 57 आणि 54 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

हेही वाचा: 'महाविकास'मध्ये फूट; शिवसेनेचा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय

देशात जवळपास १५ दिवसांपूर्वी कर्नाटमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले. बघता बघता ओमिक्रॉनने तब्बल १२ राज्यांमध्ये शिरकाव केला असून महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २१३ इतकी झाल्याची माहिती दिली आहे. तर करोनाच्या संसर्गाने देशात गेल्या २४ तासांत ३१८ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण -

 • महाराष्ट्र - ५४

 • दिल्ली - ५७

 • तेलंगणा - २४

 • कर्नाटक - १९

 • राजस्थान - १८

 • केरळ - १५

 • गुजरात - १४

 • जम्मु-काश्मीर - ३

 • उत्तर प्रदेश - २

 • आंध्र प्रदेश - १

 • चंदीगढ - १

 • तमिळनाडू - १

 • पश्चिम बंगाल - १

 • ओडिसा - २

 • लडाख - १

हेही वाचा: CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती; पगारही मिळणार चांगला

Web Title: Omicron Patients Cases India 213 Health Ministry Declared Numbers State Wise

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..