Prime Minister Narendra Modi reached Manipur late
esakal
दोन वर्षांपूर्वीच्या हिंसाचाराच्या घटनांनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उशिरा पोहोचले. याबद्दल त्यांनी मणिपूरच्या जनतेची माफी मागितली. इतकच नाही, तर त्यांनी कार्यक्रमाला उशिरा पोहोचण्याचे कारणही स्पष्ट केले.