पराभवानंतर सरकारला जाग; कर्जमाफी होण्याची शक्यता

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे तब्बल 4 लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीचा 2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.

नवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे तब्बल 4 लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीचा 2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.

ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला आकर्षित करण्यासाठी सरकारच्या वतीने ही योजना आखण्यात येत आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्यात पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भाजपामध्ये खळबळ माजली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना भाजपाला करावा लागल्याचे निकालावरुन दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरुन पंतप्रधान मोदी हे कर्जमाफीसारखा मोठा निर्णय घेऊ शकतात.

यापूर्वीच्या यूपीए सरकारनेही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. पण त्या कर्जमाफीच्या तुलनेत मोठी कर्जमाफी मोदी सरकार करु शकते. परंतु, यासाठी आर्थिक तरतुदीचे मोठे आव्हान मोदी सरकारसमोर असेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी, युवक, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार पावले उचलणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

Web Title: Pm Narendra Modi May Be Declared Loan Waiver Of Farmer Agriculture After Defeat Of 5 State Assembly Election