esakal | 74th Independence Day: मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत होऊ शकतो मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी दिले संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

PM_Narendra_Modi

भारतीय सैन्यदलातील महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी झेंडावंदन करण्यासाठी पंतप्रधान मोदींची सहाय्यता केली.

74th Independence Day: मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत होऊ शकतो मोठा निर्णय; पंतप्रधान मोदींनी दिले संकेत

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

Independence Day 2020: नवी दिल्ली : ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताची झलक सादर केली. देशाच्या विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या मोठ्या निर्णयांबाबत मोदींनी माहिती दिली. यावेळी त्यांनी देशातील मुलींना अभिवादनही केले.

पंतप्रधान म्हणाले, ''भारतात मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत आढावा घेण्यात येत आहे. मुलींच्या लग्नासाठी योग्य वय कोणते असावे? यासाठी समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्या जेव्हा याबाबतचा अहवाल देतील, त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल.'' 

74th independence day: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ''आज देशातील महिला कोळशाच्या खाणीत काम करत आहेत, तर दुसरीकडे लढाऊ विमानांमधून आकाशात उंच भरारी देखील मारत आहेत. देशात आतापर्यंत उघडण्यात आलेल्या ४० कोटी जन-धन खात्यांपैकी जवळपास २२ कोटी खाती फक्त महिलांची आहेत. कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांमध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपये थेट महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.'' 

हे वाचा - ध्वजावंदनच्या वेळी PM मोदींसोबत दिसलेल्या लष्करी महिला अधिकारी कोण माहितेय का?

दरम्यान, आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला मोजक्या मंडळींची उपस्थिती असली तरीही यंदाचा स्वातंत्र्यदिन तितक्याच जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सलग सातव्यांदा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर झेंडावंदन केले. यावेळी भारतीय सैन्यदलातील महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी झेंडावंदन करण्यासाठी पंतप्रधान मोदींची सहाय्यता केली. श्वेता पांडे या २०१२मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाल्या आहेत. श्वेता यांच्या झेंडावंदन कार्यक्रमातील उपस्थितीने देशातील तमाम जनतेला विशेष करून महिला वर्गाला नक्कीच अभिमान वाटला असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam) 

loading image