पंतप्रधान मोदींनी आई हिराबाची घेतली भेट

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आई हिराबा यांची गांधीनगरजवळील रायसन गावात भेट घेतली.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आई हिराबा यांची गांधीनगरजवळील रायसन गावात भेट घेतली. त्यांनी त्यांच्या आईसोबत सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन ते पुन्हा अहमदाबाद येथे रवाना झाले. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया भागात कार्यक्रम होत आहे. त्यासाठी ते गुजरातमध्ये आले आहेत. पंतप्रधान मोदींचे अहमदाबाद विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री विजय रुपानी आणि इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या मातोश्री हिराबा यांना भेटण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी गेले. 

मोदींनी सुमारे 20 मिनिटे आपल्या आईसोबत घालवली. त्यानंतर ते राज भवन येथे गेले. आता उद्या ते केवाडिया येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देणार आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Meets His Mother in Gujarat