"आणीबाणी दरम्यान, मी..."; मोदींनी सांगितली खास आठवण

पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शीख धर्मीयांना विश्वासात घेण्याचा भाजपचा प्रयत्न.
PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam eSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काल शीख धर्मगुरुंची (Sikh Leaders) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व धर्मगुरुंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या निवासस्थानी सर्व धर्मगुरुंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित करत, शीख धर्मीयांना विश्वासात घेण्याचं काम केलं. आगामी काळातील पंजाब निवडणुकांसाठी (Punjab Assembly Elections 2022) शीख धर्मीयांना विश्वासात घेण्याचा काम भाजपकडून केला जातोय. यावेळी कार्यक्रमाचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी स्वत: शेअर केला. यावेळी ते देशाच्या स्वातंत्र्यपुर्व काळात शीख धर्मीयांनी केलेल्या संघर्षाबद्दल बोलताना दिसत आहे. (PM Modi meets sikh leaders)

PM Narendra Modi
मनमोहन सिंग यांच्या विधानावरून निर्मला सीतारामन संतापल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना सांगितलं की, देशासाठी शीखांचं मोठं योगदान आहे. देश काय १९४७ ला थोडी तयार झाला...त्यापूर्वीही देशासाठी धर्मगुरुंनी मोठी तपस्या केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळात आपण भुमिगत होतो. त्यावेळी कपडे बदलावे लागायचे. त्यावेळी आपण शीख पोषाखात पगडीसह शीख धर्माचा परिधान करायचो असं मोदींनी सांगितलं.

PM Narendra Modi
केजरीवालांनी भगतसिंगांसोबत केली स्वत:ची तुलना; राजकारण तापलं

पंतप्रधानांनी शीख नेत्यांबरोबर वार्तालाप करून केंद्र पंजाबच्या पूर्णपणे पाठीशी आहे, असा संदेश दिला. जेवणावेळी पंतप्रधानांनी या नेत्यांना स्वतःच्या हाताने प्लेट्स दिल्या. कर्तारपूर कॅरिडॉर, वीर बाल दिन साजरा करणे व शेतकऱ्यांबाबतच्या अन्य निर्णयांबद्दल शीख नेत्यांनी मोदी सरकारचे आभार मानले. पंतप्रधानांना भेटलेल्यांमध्ये दिल्ली गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष हरमीतसिंग कालका, पद्मश्री बाबा बलबीरसिंगजी सिचेवाल, यमुनानगरचे महंत करमजीतसिंग, कर्नालचे डेरा बाबा जंगसिंगचे बाबा जोगासिंग, अमृतसरच्या डेरा बाबा तारासिंगचे बाबा मेजरसिंग,आनंदपूर साहिबचे जत्थेदार बाबा साहिबसिंग, इंदोरच्या गुरुसिंग सभेचे अध्यक्ष मनजितसिंग भाटिया भेनीसाहिबचे सुरिंदरसिंग, शिरोमणी अकाली बुद्ध दलाचे बाबा जस्सा सिंग, दमदामी टकसाळचे हरभजनसिंग, श्री पटना साहिबचे जत्थेदार रणजीत सिंग आदींचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com