'मोदीजी Rs. 1105' गॅस सिलेंडरवर पंतप्रधानांचा फोटो; नक्की काय आहे प्रकरण?

तेलंगणामध्ये गॅस सिलेंडरवर मोदीचा हसतमुख फोटो लावून केंद्र सरकारवर निशाणा साधला
'मोदीजी Rs. 1105' गॅस सिलेंडरवर पंतप्रधानांचा फोटो; नक्की काय आहे प्रकरण?

देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती हजाराच्या पार गेल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट गडबडलं आहे. अशातच महागाईचा विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध केला जातो आहे. तर तेलंगणामध्ये गॅस सिलेंडरवर मोदीचा हसतमुख फोटो लावून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. टीआरएसकडून गॅस सिलिंडरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावत त्यावर 'मोदीजी Rs. 1150' असे लिहले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी झहीराबाद मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना रेशन दुकानांवर पीएम मोदींच्या चित्रांची गरज असल्याचे सांगितले होते. याला घटनेला टीआरएसने अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ऑटोतील सिलेंडरवर पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावलेले दिसत आहेत.

झहीराबादच्या दौऱ्यावर असताना सीतारमण यांनी रेशन दुकानांवर मोदींच्या चित्रांची गरज असल्याचे सांगितले होते. अनुदानित तांदूळ पुरवल्या जाणाऱ्या तांदळाचा मोठा वाटा केंद्र सरकार उचलत असल्याचं सांगत त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर टीआरएसने पीएम नरेंद्र मोदी यांचे फोटो सिलेंडरवर लावत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

टीआरएसचे सोशल मीडिया संयोजक कृशांक मन्ने यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यावर 'सीतारामन जी, तुम्हाला मोदीजींचे फोटो हवे होते. हे घ्या फोटो' असा संदेश लिहिण्यात आला आहे. कृशांकने यांनी केलेलं हे ट्वीट बऱ्यापैकी व्हायरल झालं आहे. तेलंगणा सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील हे ट्वीट री ट्वीट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com