"भारतीय उद्योगाचा नायक हरपला"; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना| PM Narendra Modi, President Ramnath Kovind tributes to Rahul Bajaj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi, President Ramnath Kovind tributes to Rahul Bajaj
"भारतीय उद्योगाचा नायक हरपला"; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना| PM Narendra Modi, President Ramnath Kovind tributes to Rahul Bajaj

"भारतीय उद्योगाचा नायक हरपला"; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या भावना

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्यांच्या या निधनानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिक्रिया येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनीही राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मभूषण पुरस्कार विजेते उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

"श्री राहुल बजाजजी वाणिज्य आणि उद्योग जगतातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी स्मरणात राहतील. व्यवसायाच्या पलीकडे त्यांना समाजसेवेचीही आवड होती आणि त्यांच संवादकौशल्य उत्तम होतं. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना, ओम शांती." या शब्दात पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली. (PM Narendra Modi, President Ramnath Kovind tributes to Rahul Bajaj)

हेही वाचा: राहुल बजाज यांचा अल्पपरिचय

"श्री राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. भारतीय उद्योगाचे ते नायक होते. त्याच्या . त्यांची कारकीर्दीचा परिणाम देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रावरही झाला त्यांच्या निधनाने उद्योग जगतात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना." या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Pm Narendra Modi President Ramnath Kovind Tributes To Rahul Bajaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..