राहुल बजाज यांचा अल्पपरिचय | Rahul Bajaj Brief introduction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RAHUL BAJAJ DEATH IN PUNE
राहुल बजाज यांचा अल्पपरिचय | Rahul Bajaj Brief introduction

राहुल बजाज यांचा अल्पपरिचय

वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी 'बजाज ऑटो'चे अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं. विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला आव्हान देत 'बजाज ऑटो' (Bajaj) कंपनीला त्यांनी भारतातच नाही तर जगभरात पोहोचवलं. आपल्या स्पष्ट भूमिकेसाठी राहुल बजाज उद्योग जगतात प्रसिद्ध होते. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचं योगदान मोठं आहे. (Senior industrialist Rahul Bajaj has passed away today.)

हेही वाचा: मोठी बातमी : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

राहुल बजाज यांचा अल्पपरिचय (Rahul Bajaj):

  • १० जून १९३८ रोजी राहूल बजाज यांचा जन्म झाला. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं.

  • नंतरच्या काळात त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चे शिक्षण घेतले आहे.

  • १९६८ मध्ये राहुल बजाज हे बजाज ऑटोमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या पदावर रुजू झाले. १९७२ मध्ये त्यांनी 'बजाज ऑटो'ची सूत्रे हाती घेतली.

  • अनेक परदेशी कंपन्यांच्या आव्हानाला सामोरं जात त्यांनी भारतात बजाज कंपनीला नावारुपास आणले.

  • आज बजाज फक्त भारतातच नाही तर जगभरातील विविध देशांत पोहोचली आहे.

  • याचं श्रेय राहुल बजाज यांना जातं. यातून एका स्वदेशी कंपनी होण्याबरोबरच बजाजने अनेक लोकांना रोजगार मिळाले.

हेही वाचा: राहुल बजाज यांचे 'ते' वक्तव्य धाडसाचे; मुलानं केलं वडिलांचं कौतुक!

  • २००१ मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 'फोर्ब्स'च्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत राजीव बजाज यांचा समावेश आहे.

Web Title: Brief Introduction Of Rahul Bajaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..