PM मोदींना तमिळ येत नसल्याची खंत, पण राहुल गांधींनी करुन दाखवलं?

rahul gandhi and narendra modi.
rahul gandhi and narendra modi.

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपला वेळ घालवताना दिसत आहेत. विशेष करुन ते केरळच्या जनतेसोबत जास्त मिसळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केरळच्या मच्छीमारांसोबत समुद्रात डुबकी मारल्याचं पाहायला मिळालं होतं. राहुल गांधी दक्षिणेतील लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांची भाषाही शिकत आहेत. राहुल गांधी यांचा तमिळनाडूच्या गावातील लोकांसोबत मशरुमची बिर्याणी बनवताना आणि गावकऱ्यांसोबत त्याचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राहुल गांधी यांनी यावेळी गावकऱ्यांसोबत तमिळमध्ये बोलण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

राहुल गांधी सद्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. याठिकाणी ते सर्वसामान्य लोकांच्या भेटी घेताना दिसत आहेत. राहुल यांचा एका चहावाल्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात राहुल गांधी चहावाल्यासोबत तमिळमध्ये बोलताना दिसत आहेत. 'रोंबा नल्ला टी' म्हणजे तमिळनाडूतील सर्वात चांगली चहा असं ते व्हिडिओमध्ये म्हणत आहेत. राहुल गांधी तेनकाशीमधील मुरुगासेन यांच्या चहाच्या टपरीवर आले होते. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. राहुल गांधी लोकांमध्ये मिसळत तमिळ बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधला. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन होतं. यामध्ये मोदींनी तमिळ भाषेविषयी वक्तव्य केलं होतं. 'जगातील सर्वात प्राचीन भाषा तमिळ मला शिकायची होती. ती शिकण्याचा प्रयत्न करुनही मला ती शिकता आली नाही. ही माझ्यातली कमी आहे', असं ते म्हणाले होते. मोदींनी तमिळ भाषा अवघड असल्याने शिकणे सोडून दिले. पण, राहुल गांधी तमिळ भाषा बोलताना दिसत आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे.

दरम्यान, 2021 मध्ये देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यात दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेस या राज्यात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. राहुल गांधी केरळ आणि तमिळनाडू या राज्याकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. दुसरीकडे भाजपने आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जोर लावला आहे. काही दिवसांपूर्वीच पुदुचेरीमधील काँग्रेस सरकार पडले होते. पुदुचेरीत भाजप सरकार स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com