Narendra Modi : लाऊड स्पीकरशिवाय मोदींनी भाषण ठोकलं; चर्चा तर होणारच ना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi
Narendra Modi : लाऊड स्पीकरशिवाय मोदींनी भाषण ठोकलं; चर्चा तर होणारच ना!

Narendra Modi : लाऊड स्पीकरशिवाय मोदींनी भाषण ठोकलं; चर्चा तर होणारच ना!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचले. तेथे त्यांनी लाऊडस्पीकरच वापरणं टाळलं. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचा त्यांनी यातून संदेश दिला. शिवाय उशीर झाल्याबद्दल त्यांनी उपस्थितांची माफी मागितली.

राजस्थानच्या सिरोही येथील अबू रोड भागात त्यांनी रॅलीला संबोधित केले. ध्वनिक्षेपकाशिवाय त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. शुक्रवारी रात्री १० वाजता मोदी तिथे पोहोचले. मी या कार्यक्रमासाठी उशिरा पोहोचलो, परंतु आपण नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण लाऊडस्पीकरशिवाय संवाद साधत आहोत, अशा भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केल्या. शिवाय, मी पुन्हा येईन आणि तुम्ही दिलेल्या प्रेमाची व्याजासह परतफेड करीन, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा: Video : मोदी थांबू शकतात तर, आपण का नाही? पाहा गुजरातमध्ये नेमकं काय घडलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हीडिओ शेअर केलाय. यावेळी पंतप्रधानांनी स्टेजच्या खाली येत “भारत माता की जय” अशा घोषणा दिल्या आणि उपस्थित लोकांची माफीही मागितली. दरम्यान, या रॅलीसाठी सिरोही, डुंगरपूर, बांसवाडा, चित्तोडगड, प्रतापगड, बांसवाडा, पाली, उदयपूर आणि जवळपासच्या जवळपास 40 विधानसभा मतदारसंघांतून कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

राजस्थान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींचे सतीश पुनिया, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया आणि त्यांचे उपराजेंद्र राठोड यांनी स्वागत केले.