HappyBirthdayPM : नर्मदेची पूजा ते आईचा आशीर्वाद; मोदींचा आजचा कार्यक्रम 

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

आज सकाळीच मोदी गुजरातमधील केवडीया येथे दाखल झाले आहेत. नर्मदा नदीची पूजा करून त्यांनी दिवसांची सुरूवात केली. त्यानंतर ते आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. सर्वप्रथम मोदींनी नर्मदा जिल्ह्यातील बंधाऱ्याची हवाई पाहणी केली. त्यांचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर नर्मदा नदीची पूजा केली.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा वाढदिवस नर्मदा नदीची पूजा करून साजरा करत असून, ते आज दुपारी आई हिराबेन यांचाही आशीर्वाद घेणार आहेत.

आज सकाळीच मोदी गुजरातमधील केवडीया येथे दाखल झाले आहेत. नर्मदा नदीची पूजा करून त्यांनी दिवसांची सुरूवात केली. त्यानंतर ते आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादला जाणार आहेत. सर्वप्रथम मोदींनी नर्मदा जिल्ह्यातील बंधाऱ्याची हवाई पाहणी केली. त्यांचा याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर नर्मदा नदीची पूजा केली.
HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण

HappyBirthdayPM : मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
मोदी सोमवारी रात्री दहा वाजता अहमदाबादेत दाखल झाले. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्या देवव्रत, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी विमानतळावर स्वागत केले. दरम्यान, नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता केवाडियातील सरदार सरोवरजवळ कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सरोवराविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच जंगल सफारीविषयी माहिती जाणून घेतली. मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा हेलिकॉप्टरमधून घेतलेला व्हिडीओही शेअर केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi reviews tourism infrastructure at Kevadia in Gujarat